जीवन संघर्षाशी दोन हात करण्यास इच्छाशक्ती लागते

0

एरंडोल (रतिलाल पाटील) । माणसाकडे काम करण्याची धमक व इच्छाशक्ती असल्यास जीवन गडाच्या संघर्षाशी दोन हात करतांना आपण कधीच अपयशी होत नाही. माणसाने नेहमी प्रयत्नशील असणे गरजेचे असते, जरी अपयश आले तरी आपण तेथेच खचून न जाता अधिक जोमाने दुसरा प्रयत्न करायला पाहिजे. आपण अपंग असल्याची दुसर्‍याकडून सहानुभूती न बाळगता सतत आपल्याकडून कोणीतरी प्रेरणा घेईल असे आपण करायला पाहिजे, अशी माहिती तालुक्यातील खडके खुर्द येथील प्रकाश पाटील यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.

पाटील यांचे 2002मध्ये गावातीलच मायबाई यांच्याशी विवाह झाला विवाहनंतर पाटील याना आपल्या मिळकतीत वाढ होणे गरजेचे असल्याचे जाणवायला लागल्यानंतर आपल्या मिळकतीत वाढ कशी करता येईल, अशी पत्नीशी चर्चा करून त्यांनी आपल्या राहत्या घरीच किराणा मालाचे दुकान सुरु केल्यानंतर मिळकतीत वाढ करून घेतली. मायबाई यांनी आपल्या पतीची वडिलोपार्जित शेती स्वतः करून संसाराला हातबार लावत आहे.

आज पाटील यांचे खडके येथे एक तर एरंडोल शहरात एक किराणा मालाचे दुकान आहे. प्रकाश पाटील यांना एक मुलगी एक मुलगा असून पाटील हे त्यांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष घालतात त्याचप्रकारे आपल्या आई वडिलांचा चांगल्याप्रकारे सांभाळही करत आहे. ‘वाळूची कणे रगळीता तेल ही गळे’ हे प्रकाश पाटील यांनी सिद्ध करून दाखविले.

तालुक्यातील खडके खुर्द येथील प्रकाश नामदेव पाटील लहानपणी घराची परिस्थिती हलाकीची त्यात प्रकाश पाटील यांचा 1992मध्ये अपघात होऊन त्यांना अपंगत्व आले. पाटील यांना अपघात झाल्यामुळे त्यांच्या मज्जातंतू इजा झाल्याने त्यांना चालणे फिरणे अवघड झाल्याने दिवसभर घरीच असायचे रिकामे असल्याने त्यांच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊन आपले पुढे कसे होणार? आपण जिवन कसे जगू? पण पाटील खचून न जाता त्यांनी ब्रेड, पोंगे, गोळ्या बिस्कीट आपल्या घराच्या ओट्यावर बसून विक्री करणे सुरु करून आपल्या अपंग जीवनास नवी दिशा देऊन सुरवात केली. पुढे हळूहळू याचे रुपांतर पानगल्यात करून आपल्या छोट्याशा धंद्यास चालना दिली.