जीवन पध्दतीमध्ये बदल करुन माणूसकी जपणे म्हणजेच हिंदूत्व

0

भुसावळ । हिंदू धर्माचा जन्म भारतात झाला असून निसर्गाशी जुळवून घेणे म्हणे धर्म होय. तसेच आपली जीवन पध्दतीमध्ये बदल करुन माणूसकी जपणे म्हणजे हिंदू धर्म असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. व्ही.व्ही. काटदरे यांनी केले. नाहाटा महाविद्यालयात भुगोलशास्त्र मंडळ आयोजित भुगोल सप्ताहांतर्गत बुधवार 18 रोजी भूगोल- हिंदू धर्म आणि सामाजिक सलोखा या विषयावर प्रा. डॉ. व्ही.व्ही. काटदरे यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रा. डॉ. एम.व्ही. वायकोळे होत्या. कार्यक्रमास प्रा.पी.एम. देवे, प्रा.डॉ.पी.ए. अहिरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.आर. सदांशिव, प्रा.यु.बी. नंदाणे, प्रा.डॉ.आर.एस. नाळेकर, प्रा.एस.टी. धूम, प्रा. व्हि.ए. सोळुके, प्रा. किशोर चौधरी, भुगोल विभाग प्रमुख प्रा. व्हि.पी. लढे उपस्थित होते.

देवासारख्या माणसांना अस्पृश्यता मानने चुकीचे
सुरुवातीला प्रा. डॉ. काटदरे यांनी हिंदू धर्माविषयी बोलताना सांगितले की, मराठी बारा महिन्याचे महत्व हिंदू धर्मात कसे आहे ते पटवून दिले. चार वेद, सत्तावीस नक्षत्र, उपवासाचे वैज्ञानिक महत्व, आश्रम व्यवस्था या सर्वांचा भोगलाशी कसा जवळचा संबंध आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जात ही जन्माने येत नसून ती व्यवसायाने यावी जेणे करुन धर्मा- धर्मा मधील भेद नष्ट होईल व धर्मा मधला तेढ कमी होईल या शिवाय स्वच्छता करणे हे दैवी काम असून देवासारख्या माणसांना अस्पृश्यता मानने चुकीचे आहे. आणि विशेष बाब म्हणजे हिंदू धर्म हा परिर्वतशिल आहे आणि कपडे घालणे म्हणजे धर्म नव्हे तर कपड्या मधला माणूस किती चांगला आहे हा धर्म होय. परिस्थितीच्या वरती उठणे म्हणजे मन स्वच्छ करणे हे धर्माचे काम आहे. आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. वायकोळे यांनी माणूसकी या धर्माचे आचरण करणे म्हजेच धर्म असल्याचे सांगितले.

पोस्टर स्पर्धेत 72 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
यानंतर पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. काटदरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या पोस्टर स्पर्धेत 72 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर रांगोळी स्पर्धेत एकूण 10 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात विजयी झालेल्या स्पर्धकांना भूगोल सप्ताह समारोपाच्या दिवशी परितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे. सुत्रसंचालन हेमलता शिंदे व घनशाम खंबायत यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय तुषार कुंभार, प्रास्ताविक कल्पेश बाविस्कर यांनी केले. तर आभार कोमल वाणी हिने मानले.