जीवनात एकनिष्ठ राहीले तर त्याचे फलित मिळते

0

चाळीसगाव । जीवनात अनेक प्रसंग येतात त्यावेळी प्रत्येक व्यक्तीची परीक्षा एकनिष्ठता घेत असते. मात्र अशा काळात कायम आपण एकनिष्ठ जर असलो तर निश्‍चितच त्याचे फलित कालांतराने चांगले पहायला मिळते. जीवनात प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आहे. अशा भावना स्विकृत नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी रामचंद्रभाऊ मित्र मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या सत्काराचा कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्यात.

रामचंद्रभाऊ जाधव मित्र मंडळातर्फे कार्यक्रम
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुनिल राजपूत, रवींद्र अमृतकार, मेघा बक्षी, डॉ.संतोष मालपुरे, जगदीश चौधरी, संजय बारीस, भाऊराव जाधव, दीपक पाटील, डॉ.विनोद कोतकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनिल राजपूत यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात रामचंद्रभाऊ जाधव यांच्या कार्याची माहिती सांगितली. त्याचबरोबर रमेश पोतदार, डॉ.विनोद कोतकर यांनी मनोगत व्यक्त केलीत. त्यात त्यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद करून रामचंद्र जाधव यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष मालपुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परशुराम महाले, चंद्रकांत पाटील, श्रीकृष्ण अहिरे, देविदास दायमा, भालचंद्र दाभाडे, प्रविण जाधव, गौतम जाधव, मयुर जाधव, दीपक पाटील, अनिल मालपुरे, नरेंद्र शिरूडे, बापू चौधरी यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक पाटील यांनी केले तर आभार संजय सोनवणे यांनी मानले.