Private Advt

जीर्ण पाईप लाईनची डोकेदुखी कायम : भुसावळ शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

भुसावळ : जीर्ण पाईप लाईनमुळे पुन्हा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची बाब शुक्रवारी समोर आली आहे. रेल्वे कॉलनी परीसरात पाईप लाईन लिकेज झाल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली असलीतरी पुन्हा पाईप लाईन लिकेज झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू होती. परीणामी शनिवारी होणारा पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे.

जीर्ण पाईप लाईनची डोकेदुखी
पालिकेची मेन रायसिंग जीर्ण झाल्याने वर्षभरात शेकडो वेळा ती लिकेज होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यातच मंगळवारी या पाईप लाईनीला मोठेच भगदाड पडल्याने पालिकेकडून बुधवारी सकाळपासून फुटलेली पाईप लाईनला वेल्डींगच्या सहाय्याने जोडण्यात आले व चाचणीही यशस्वी झाली मात्र गुरूवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास पाईपातील पाण्यातील दाबामुळे या पाईप लाईनीला पुन्हा खालच्या बाजूने छिद्र पडून लिकेज झाले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी 12 नंतर या पाईपातून वाहणारे पाणी बंद करण्यात आले. नंतर लिकेज जोडण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी भेट देत पाहणी केली. पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख व पाणीपुरवठा विभागातील अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.