Private Advt

जि.प.शाळेच्या मालमत्तेचे नुकसान : एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा

रावेर : जिल्हा परीषद शाळेची लोखंडी नेट तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्‍या एका इसमाविरुध्द रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर तालुक्याती खिरवड येथील जिल्हा परीषद केंद्र शाळेच्या इमारतीला संरक्षणासाठी लोखंडी तार कुंपण केले असून संशयीत आरोपी शफी शकील शेख याने इमारतीच्या नेटचे कुंपण तोडून त्याठिकाणावरुन स्वताच्या वापरासाठी गेट तयार केले आणि सार्वजनिक मालमत्तेची चार ते पाच हजाराचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला तरुण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी शफी शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.