जि.प.माजी उपाध्यक्षांकडून 400 कुटूंबांना धान्य वाटप

0

रावेर (प्रतिनिधी) : हातावर पोट असणाऱ्या गरीब जनतेसाठी तांदलवाडीत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी त्यांच्यासाठी आपले धान्याचे गोडाऊन उघडून गावातील सुमारे चारशे कुटुंबाना त्यांनी धान्य वाटप केले आहे.त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

जि.प.माजी उपाध्यक्षांकडून 400 कुटूंबांना धान्य वाटप 1

कोरोना या महामारीमुळे गावा पासुन थेट मेट्रो सिटी पर्यंत संपूर्ण लॉकडाउन असून तांदलवाडी गावात सुध्दा संचारबंदी असून गावातील काही कुटुंब ज्यांच्या हातावर पोट आहे. अश्याच्या घरात धान्य संपल्याची वार्ता जि.प. माजी उपाध्यक्ष नंदकीशोर महाजन यांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले धान्य गावातील गरीब जनतेला प्रत्येकी पाच-ते-सात किलो प्रमाणे वाटप केले. तालुक्यात एखाद्या राजकीय व्यक्ती कडून धान्य वाटपाची ही पहिलीच वेळ आहे.

Copy