जि.प. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

0

जळगाव: कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यात आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोना फायटर म्हणून भूमिका बजवीत आहे. मात्र जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे एप्रिलपासूनचे वेतन अद्याप झालेले नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य जि.प.बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी संचालक, सहसंचालक, उपसंचालक याना निवेदन दिले आहे. मार्च महिन्याचे वेतन 75 टक्के अदा करण्यात आले आहे, त्यातच एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप झालेले नसल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ए.एस.सपकाळे, सह कोषाध्यक्ष सुनिल ढाके, राज्य संघटक प्रमोद रंगरे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.