जिल्ह्यावर पुन्हा शोककळा: महिन्याभरात चाळीसगावचा दुसरा जवान गमावला

0

जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील सैन्य दलातील जवान यश देशमुखला दोन आठवड्यांपूर्वीच दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. समस्त जळगावकर आणि चाळीसगावकरांवरचे दु:ख ताजे असतानाच पुन्हा एक जवान शहीद झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित साहेबराव पाटील (वय 32) हे बीएसएफमध्ये जम्मू- काश्मीर येथे कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून त्यांचा अपघात झाला होता. यात उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या मृत्‍यूने गेल्‍या महिनाभरात चाळीसगाव तालुक्‍यातील दोन जवानांच्‍या मृत्‍यूने चाळीसगाव तालुक्यावर पुन्हा शोककळा पसरली आहे. वाकडी येथील रहिवासी साहेबराव नथु पाटील यांचे मोठे चिरंजीव अमित साहेबराव पाटील हे 2010 मध्ये बीएसएफ अर्थात बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये कार्यरत झाले होते. जम्मू– काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना आठ दिवसांपूर्वी त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळली होती. उपचार सुरू असताना आज बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

शहीद जवान अमित पाटील यांचे पार्थिव आज रात्री जम्मू-काश्मीर वरून पुणे येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर ते चाळीसगाव तालुका तील वाकडी येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून अद्याप वेळ निश्चित नसल्याची माहिती त्यांचे मित्र अतुल पाटील व बालासाहेब पाटील यांनी दिली.

Copy