जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ९९३ पासेस मंजूर

0

जळगाव – लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनातर्फे ९९३ पासेस मंजूर करण्यात आले असल्याचे नोडल अधिकारी रवींद्र भारदे यांनी कळविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर परजिल्ह्यातील अनेक नागरिक जिल्ह्यात अडकले होते. अशा अडकलेल्या नागरिकांसाठी शासनाच्या आदेशानुसार इतर जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित नागरिकांना तहसीलदारांकडे ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. आत्तापर्यंत ९९३ पासेस मंजूर करण्यात आले आहे. त्यात नाशिक ५१९, धुळे २३३, औरंगाबाद ९८, अहमदनगर ४७ असे पासेस मंजूर करण्यात आले असल्याचे नोडल अधिकारी रवींद्र भारदे यांनी कळविले आहे. तर ६४८ पासेस नामंजूर करण्यात आले असुन ७४२ अर्ज प्रलंबीत आहेत.

Copy