जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षकांकडून सीमा बंदी पाहणी

0

पाचोरा( प्रतिनिधी ) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाय योजना केल्या आहेत त्याअंतर्गत आज ता. २० सोमवार रोजी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी जळगांव-औरंगाबाद जिल्ह्यातील सीमा बंदीची पाहणी केली. यावेळी पाचोरा तालुक्यातील दिघी येथे भेट देत पाहणी करत कर्मचार्‍यांना सूचना दिल्या.

पाचोरा येथे परप्रांतीय मजुर मजूर आयसोलेशन केलेल्या शक्ती धाम येथे मजुरांच्या निवारा गृहास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी भेट दिली. गेल्या तीन दिवसापासून शासनाने स्थापन केलेल्या या निवारा गृहांमध्ये एकूण ४३ परप्रांतीय मजूर असून त्यामध्ये सहा महिला व चार बालकांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी संयुक्तपणे सदर ठिकाणची पाहणी केली व मजुरांची संवाद देखील साधला. मजुरांना देण्यात येणार्‍या सुविधांची देखील पाहणी केली. तसेच प्रशासन व विविध सामाजिक संस्था यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक देखील केले. मजुरांशी संवाद साधताना सदर मजुरांना दिनांक ३ मे पर्यंत या ठिकाणी थांबावे लागेल तसेच त्यांना स्थानिक कामातून रोजगार देण्याबाबतही आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

यांची होती उपस्थिती

यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे ,तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, नायब तहसीलदार अमित भोईटे, शक्तीधाम मोर, तसेच महेंद्र अग्रवाल, बांठिया यांचे समवेत स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, पुनगावचे पोलीस पाटील, कोतवाल तसेच नगरपालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.