Private Advt

जिल्ह्यात 108 अंगणवाड्यांना मिळणार स्वतःच्या इमारती

जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षी 108 अंगणवाडी इमारत बांधकामसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 10 कोटीचा निधी मंजूर केला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 108 अंगांवड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी प्राधान्य क्रमानुसार अंगणवाडी बांधकामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहे.
जिल्ह्यात अजूनही 376 अंगणवाड्याना स्वतःच्या इमारती नाही. त्यामुळे उर्वरित असलेल्या 376 अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी 3
वर्षात टप्या-टप्याने 100% निधी मंजूर करून अंगण वाड्यांसाठी 100% स्वतःच्या इमारती असलेला जळगाव जिल्हा असेल अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात 3438 तर जिल्हा परिषद अंतर्गत शहरी भागात 203 असे एकूण 3641 अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. मागील सन 2019- ते 2020-21 या दोन वर्षांच्या कार्यकाळात डीपीडिसी मधून एकूण तब्बल 282 अंगणवाड्या साठी 24 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, अंगणवाडी बांधकामे प्रगतीत आहे तर काही कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व, जिल्हाधिकारी अभिजित राउत व मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. पंकज आशिया यांनी अंगणवाड्या, शाळा खोल्या व स्मशानभूमी बांधकामासंदर्भात गंभीर दाखल घेऊन डीपीडीसी मार्फत 2 ते 3 वर्षात सदरची 100% बांधकामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

चालूवर्षी तालुकानिहाय मंजूर अंगणवाड्या

ज्या अंगणवाडी केंद्र उघड्यावर, भाड्याच्या रूम मध्ये, एकत्र किंवा ग्रामपंचायत इमारतीत भरत होत्या जिल्ह्यातील अश्या 108 अंगणवाड्याना प्रशासकीय मान्यता देण्यात याव्या असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जिल्ह्यात 108 अंगणवाड्या इमारत बांधकामसाठी प्राधान्य क्रमानुसार अंगणवाडी बांधकाम प्रशासकीय मान्यता दिली असून त्यात अमळनेर – 4 , भडगाव – 4 , भुसावळ – 2, बोदवड – 3 , चाळीसगाव – 11 , चोपडा – 8 , धरणगाव – 6, एरंडोल – 5 , जळगाव – 8 , जामनेर – 12 , मुक्ताईनगर – 5 , पाचोरा – 8 , पारोळा – 6 , रावेर – 8 , यावल – 18 अश्या 108 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बालकांना शैक्षणिक दृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.