जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील : वाईन शॉप्स मंगळवारपासून उघडणार

0

जळगाव – जिल्ह्यात तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन दि. १७ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. असे असले तरी या तिसर्‍या टप्प्यात मात्र लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. त्यामुळे सलून, हॉटेल, बियरबार, परमीट रूम, मॉल, थिएटर, जीम, ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थांच्या गाड्या हे वगळता इतर सर्व दुकाने खुली करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. दरम्यान तळीरामांसाठी खुशखबर असुन जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणचे वाईन शॉप मंगळवारपासून उघडण्यास परवानगी असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Copy