जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

0

जळगाव । युवकांचे प्रेरणास्त्रोत तथा राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधुन स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यात आले. आज जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकिय आणि विविध संघटनांतर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करत त्यांच्या जीवनाविषयी माहिती देत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. चाळीसगावातील रयत सेना, संभाजी सेना, तालुक्यातील चितेगाव ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, उमंग व्याख्यानमालेत अभिवादन करण्यात आले. अमळनेरात दीपसागर फाऊंडेशन, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्याहस्ते, सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रतिमा पुजन करण्यात आले.

चितेगाव ग्रामपंचायततर्फे प्रतिमा पुजन :
चाळीसगाव । तालुक्यातील चितेगाव येथील गृप ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ तसेच युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व सरपंच अमोल भोसले, ग्रामसेविका सविता पांडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना गणेश पवार म्हणाले कि यांचे विचार युवकांनी आत्मसात करावे. समाजात त्यांचे विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करावे. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्यासाठी दोन छत्रपती दिले. त्यांचे स्वराज्यासाठी योगदान खुप मोलाचे होते. महाराष्ट्रात महिला व मुलींवर अत्याचारात वाढ झाली असुन आजच्या युगात जिजाऊ सारखे धाडस महिला व तरुणींनी दाखवावे, अशी माहिती दिली. यावेळी महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधत रयत सेनेच्या वतीने आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सरपंच अमोल भोसले, उपसरपंच किरण जाधव, ग्रामसेविका सविता पांडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, सरपंच अमोल भोसले, उपसरपंच किरण जाधव,ग्रामसेविका सविता पांडे,प्रभावती गायकवाड,लता देशमुख, प्रांजल देशमुख पी.एन.पाटील, प्रमोद वाघ, देवेंद्र राजपूत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

अमळनेरात दीपसागर फाऊंडेशनतर्फे अभिवादन कार्यक्रम
अमळनेर । सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या दीपसागर फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रिय युवक दिनाचे औचित्य साधुन स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार व शिक्षक ईश्वर महाजन यांनी प्रतिमेस माल्यार्पण केले. कार्यक्रमस प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाअध्यक्ष सुनील पाटील. तसेच उदयेजक किरण सावंत उपस्थित होते. यावेळी विवेकानंद यांच्या जिवनावर दिव्येश पाटील या विद्यार्थीने मनोगत व्यक्त केले. विवेकानंद यांचे जीवन व तरुण यावर बोलतांना त्याने तरुणास विवेकानंद हे प्रेरणास्थान व सकारात्मक उर्जाकेंद्र असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाने ईश्वर महाजन यांनी दीपसगर फाउंडेशनच्या सदैव होत असलेल्या सामाजिक कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष कौस्तुभ पाटील सामजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मयूर पाटील, शशांक पाटील, मयूरेश पाटील, सूरज अमृतका, देवेन्द्र बागुल, अतुल भदाने, आदित्य पाटील, भाविक पाटील, अविनाश जाधव, हर्शल पाटील, प्रतिक पाटील, अर्शद खटीक, हेमंत पाटील, पराग पाटील, भाग्येश पाटील, दर्शन धनगर, गणेश पाटील, चंद्रशेखर पाटील, निखिल पाटील, भूषण चौधरी, निकेश जाधव, अरविंद पाटील, प्रथमेश कदम आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश पाटील यांनी मानले.

संभाजी सेना वर्धापनदिनानिमित्त जिजाऊंना अभिवादन
चाळीसगाव । संभाजी सेनेचा चौथा वर्धापनदिन व जिजाऊ माता जयंती संभाजी सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी संपुर्ण व्यासपिठावर अतिथी म्हणून महीला उपस्थित होत्या. यावेळी जिजाऊ माता यांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन करून नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मान्यवरांनी संभाजी राजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी संभाजी सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन महीला अतिथींच्या हस्ते तर संभाजी सेनेच्या विशेष अंकाचे प्रकाशन माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, रा.शि.मंडळाचे संचालक विश्वास चव्हाण, डॉ.प्रमोद सोनवणे, डॉ.अजय पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सोनवणे सर, रणजित पाटील, प्रकाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वास चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून संभाजी सेनेच्या सामाजिक कार्यात आमचा सदैव सहभाग असेल असे सांगितले. तर संभाजी सेना विधी सल्लागार व आधार वेैंद्राच्या अध्यक्षा अ‍ॅड. आशा शिरसाठ गोरे यांनी संभाजी सेना प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराची जाणीव ठेवून कार्य करणारी संघटना असल्याचे सांगत सामाजिक व राजकीय संस्थांनी विशिष्ट प्रसंगी एकत्र येवून समाजाभिमूक एकात्मिक कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. आशालता चव्हाण, डॉ. भाग्यश्री शिनकर, अर्जुन मोरे, डॉ. चेतना कोतकर, प.स. सभापती आशालता साळूंखे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. रमेश पोतदार यांनी शिवाजी राजांची सुबक आकृती संभाजी सेनेला भेट दिली. जनतेच्या न्याय हक्कासाठी संभाजी सेना सदैव्य संघर्ष करत राहील असे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी सांगितले. प्रास्ताविक विजय गवळी तर आभार गिरीष पाटील यांनी मानले. यावेळी डॉ. ज्योती पाटील, विमल पाटील, स्मिता पाटील, माजी. गटविकास अधिकारी मालजी जाधव, लता दौंड, अलका मोरे, छाया मोरे, प्रतिभा पाटील, अविनाश काकडे, दिवाकर महाले, राहूल अहीरे, सुनिल पाटील आधार महाले, रविंद्र शिनकर, अरूण रोकडे, गजानन चंदनशिव, बंटी पाटील, विजय देशमुख, भरत नेटारे, उपस्थित होते.

लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केले अभिवादन
अमळनेर । शहरातील तहसील कार्यालय समोरील राजमाता जिजाऊ प्रवेशद्वारा जवळ रात्री 12 वाजता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता यांच्या जयंती निमित्त माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्याम पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, मराठा सेवाचे संघाचे मा.जि.अ. मनोहर नाना, उत्तमराव देशमुख, संभाजी ब्रिगेड प्रवक्ता संदेश पाटील, जयवंत शिसोदे, सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम, बाजार समिती संचालक सचिन पाटील, पंचायत समिती माजी सभापती सुभाष देसले, तालुकाध्यक्ष प्रशांत भदाणे, नगरसेवक राजेश पाटील, मनोज पाटील, नरेंद्र संदनशिव, साखरलाल महाजन, पिंटू बागुल, बाबू साळुंखे, संदीप पाटील, किरण पाटील, अक्षय चव्हाण, आशिष पवार, ज्ञानेश्वर देसले, महेंद्र पाटील, निलेश महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रतिमा पुजन
अमळनेर । येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे उपशिक्षक आनंदा पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपुरकर, धर्मा धनगर आदिंनीही पुष्प अर्पण करून प्रतिमा पूजन केले. यावेळी शिक्षकवृंद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठान
चाळीसगाव । सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे येथील घाट रोड स्थित रामवाडी येथे राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकांनद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे व मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख शुभम चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश नायर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत कदम, तालुकाध्यक्ष विवेक रणदिवे, शहराध्यक्ष पपू राजपूत युवा तालुकाध्यक्ष किरण घोरपडे यांच्या हस्ते प्रतिपादन करण्यात आले. यावेळी अजय जोशी, निलेश हमलाई, रवींद्र सूर्यवंशी, शरद पाटील, मुराद पटेल, आरीफ खाटीक, गौरव पाटील, संजय गायकवाड, विजय गायकवाड, मुन्ना पगार, प्रहर्ष लिंडायत, गोरख पवार, बंशी जोशी, हर्षल कुडे, रवी पाटील आदी.

सार्वजनिक बांधकाम विभागात अभिवादन
चाळीसगाव । शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयात आईसाहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी इजि.यु.जी.पाटील, इजि. श्री.चव्हाण, श्री.साळवे, शाहू मराठाचे संपादक, प्रशांत गायकवाड अ‍ॅड.संतोष पाटील आदी.