जिल्ह्यात मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन

0

जळगाव । सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आज मंगळवार 31 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान ‘चक्का जाम’ आंदोलन जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत प्रांतधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा चाळीसगावतर्फे खडकी बायपास आंदोलन केले, अमळनेरात बोरी नदीवरील फरशी पुलावर आंदोलन केले, चोपडा येथील धरणगाव नाक्यावर तालुक्यातुन मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र येवून समाजाच्या मागण्या केल्या. नगरदेवळा स्टेशन येथील उड्डाणपुलाजवळ मोठ्या प्रमाणात चक्का जाम करण्यात आले.

चाळीसगाव । कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, अट्रासिटी कायद्यात बदल करा, शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव देऊन त्यांचे कर्ज माफ करा, त्याच प्रमाणे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 5 हजार कोटी रुपयांचा निधी द्या या मागणीसाठी चाळीसगाव येथे खडकी बायपास वर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जवळपास 2 तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजातील हजारो समाज बांधव या चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तर पोलिसांनी यावेळी कडक बंदोबस्त ठेवला होता.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
आंदोलन स्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सुनील गायकवाड, तहसिदार कैलास देवरे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, वाहतूक शाखेचे स पो नि सुरेश शिरसाठ यांचे सह पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. आंदोलन स्थळावरून पोलिसांनी जवळपास 60 जणांना अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या या आहेत मागण्या
सकल मराठा समाजाला लोकसंख्या व घटनेतील अधिकारी प्रमाणे शासनाने लागू केलेले राणेे समितीच्या शिफरशीनुसार 16 टक्के आरक्षण तात्काळ मराठा आरक्षण द्यावे, नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटना अद्यापही फास्ट ट्रॅक कोर्टात चालत नाही. ह्या घटनेतील आरोपीला तात्काळा शिक्षेसाठी शासनाने नेमून दिलेल्या वकीलांनी हालचाल करावी, शेतकर्‍यांसाठी तात्काळ स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, जिल्ह्याजिल्ह्यात अल्पभूधारक शेतकर्‍यासही शासनाच्या वतीने वसतीगृहे सुरू करावी.

घोषणांचा पाऊस : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जय भवानी जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, लबाड सरकारचे करायचे काय खाली डोकं वरती पाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आवाज कुणाचा मराठ्यांचा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

नगरदेवळा । येथील सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी सकाळी 11 वाजता नगरदेवळा स्टेशन येथील उड्डाणपुलाजवळ मोठ्या प्रमाणात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. नागपूर- मुंबई महामार्गावरची वाहतुक बराच काळ विस्कळीत झाली होती. मराठा समाज बांधवांनी आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोणा करून रस्त्यावरच ठाण मांडले होते. भडगावला नायब तहसीलदारांना यावेळी नामदेव पाटील, मोहन तावडे, अशोक सोन्नी, सागर पाटील, माणिक पाटील यांनी निवेदन सादर केले. याप्रकरणी नगरदेवळा या संपूर्ण पोलीस स्टाफ, भडगावचे पी.आय. डी.के. परदेशी, नगरदेवळाचे एपीआय सानप, तथा भडगा राखिव पोलिस दल यांनी बंदोबस्ताचे काम पाहिले.

चोपड्याचे आंदोलन धरणगाव नाक्यावर
चोपडा । चोपडा येथे धरणगाव नाक्यावर तालुक्यातुन मोठ्या संख्येने मराठा समाज सकाळी 10.30 वाजेला आंदोलनास सुरूवात करण्यात आली. यावेळी नाक्यावर चक्काजाम आंदोलन करत पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यशस्वी झाले असुन कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शातंतेत पार पडले. सकाळी 11वाजेला तहसिलदार दिपक गिरासे यांनी घटनास्थळी भेट घेऊन निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. मोर्चा स्थळी जय जिजाऊ जय शिवराय आश्या घोषणा देण्यात आल्या तसेच प्रस्तावना चेतन सोनवणे यांनी केली तर मोर्चाला मार्गदर्शन संजीव सोनवणे यांनी स्वामिनाथन आयोग त्वरित लागू करावा, कोपर्डी येथील घटनेला न्याय मिळावा, सनदशीर मार्गाने कलम 340 नुसार मराठ्यांना आरक्षण मिळावे आतापर्यंत मोर्चे हे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काढण्यात आलेले आहे पण यापूढे मोर्चाची दिशा ही त्या त्या भागातील आमदार व खासदारांच्या घरासमोर राहील, असे सुचविण्यात आले.

यांची होती उपस्थिती अपात्कालीन परीस्थितीसाठी अग्निशामक दल, पोलीस दल सज्ज करण्यात आलेले होते. मोर्चास्थळी डीवायएसपी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक नजन पाटील उपस्थित होते. यावेळी दिलीपराव सोनवणे, घनश्याम पाटील, राजेंद्र बिटवा पवार, संजीव सोनवणे, प्रमोद पाटील, महेश मुलमुले, मनोहर पाटील, सचिन पाटील, दिनेश बाविस्कर, राजाराम पाटील, विकास पाटील, प्रमोद बोरसे, धनंजय पाटील, प्रदीप पाटील, दिव्यांक सावंत, पंकज नरवाडे, सचित पाटील, नारायण पाटील, अनिल पाटील, चेतन पाटील, संदिप पाटील, भुषण पवार, गिरीष पाटील, अतुल ठाकरे आदी असंख्येने मराठा समाज हजर होते.

आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
आंदोलनामध्ये आमदार उन्मेष दादा पाटील, लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, प्रमोद पांडुरंग पाटील, अरुण पाटील, खुशाल पाटील, उमेश पवार, प्रा. तुषार निकम, डॉ.अजय पाटील, योगेश पाटील, मधुकर गुंजाळ, शांताराम पाटील, पप्पूदादा (उमेश) गुंजाळ, कृउबाचे माजी सभापती रमेश चव्हाण, कैलास सूर्यवंशी, सुधीर पाटील, विश्व्जीत पाटील, किशोर पाटील, यशवंत पाटील, धनंजय मांडोळे, दिलीप घोरपडे, सुजित गायकवाड, डॉ. दत्ता भदाणे, पांडुरंग बोराडे, सुदर्शन देशमुख, भाऊसाहेब पाटील, धनंजय चव्हाण, निलेश निकम, हरी जाधव, पप्पू पाटील, प्रमोद वाघ, भूषण पाटील, धनंजय देशमुख, बाजीराव दौंड, भैयासाहेब पाटील, पंकज पाटील, किशोर पाटील, देवेंद्र पाटील, डी.ओ.पाटील, भरत नवले, निवृत्ती कवडे, भरत पाटील, निंबा जगताप, गिरीश पाटील, कृष्णा जाधव, भावडू चव्हाण, टोनु राजपूत, विजय गायकवाड, अमोल भोसले राजू मोरे, अतुल पाटील, भूषण पाटील, मनोज भोसले, बंडू पगार यांचे सह तालुका भरातील हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधव आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

अमळनेरात बोरी नदीवर केले आंदोलन
अमळनेर । येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील बोरी नदी येथील फरशी पुलावर सकाळी 11 वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले संयमी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झाले. यावेळी मराठा समाजातर्फे विविध मागण्या करत कोपर्डी घटनेचा निषेध करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणास लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, या आंदोलनात माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, तालुकाध्यक्ष प्रशांत भदाणे, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, रा.कॉ.तालुका अध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक राजेश पाटील, अभिषेक पाटील, हिम्मत पाटील, संभाजी ब्रिगेड प्रवक्ता संदेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे निलेश पाटील, अनंत निकम, पिंटू बागुल, पप्पू नेरकर, भूषण भदाणे, निलेश महाजन, अधिकराव पाटील, अक्षय चव्हाण, चेतन पाटील, गुणवंत पाटील तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.