जिल्ह्यात पुन्हा तीन जण कोरोना पॉझिटिव्ह

0

जळगाव! जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान आज जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथील स्वॅब घेतलेल्या 273 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 270 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे .

Copy