पाच दिवसात नवीन अडीच हजाराहून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले

0

जळगाव । जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 595 नविन रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्ण संख्या 17 हजार 131 झाली आहे.  सर्वाधिक 144 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 403 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. शुक्रवारी नव्याने 595 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 144, जळगाव ग्रामीण 21, भुसावळ 7, अमळनेर 77, चोपडा 25, पाचोरा 27, भडगाव 6, धरणगाव 40, यावल 6, एरंडोल 65, जामनेर 35, रावेर 7, पारोळा 53, चाळीसगाव 30, मुक्ताईनगर 41, बोदवड 2 व इतर जिल्ह्यातील 9 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी 2, जळगाव तालुका, पाचोरा, चोपडा, रावेर, चाळीसगाव या तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी
दिली आहे.

Copy