जिल्ह्यात नव्याने 773 कोरोनाबाधीत

0

अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 196 नविन रूग्ण

जळगाव– जिल्ह्यात शनिवारी नव्याने 773 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या 32 हजार 433 झाली आहे. सर्वाधिक 196 रुग्ण हे अमळनेर
तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे 463 रुग्ण कोरेानामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. रविवारी नव्याने 773 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 42 , जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 68, अमळनेर 196 , चोपडा 69, पाचोरा 74, भडगाव 16, धरणगाव 29, यावल 38, एरंडोल 36, जामनेर 46, रावेर 75, पारोळा 36, चाळीसगाव 25, मुक्ताईनगर 6, बोदवड 10, इतर जिल्ह्यातील 1 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर , भुसावळ या तालुक्यांत प्रत्येकी 4 तर जळगाव ग्रामीण, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे

Copy