जिल्ह्यात नव्याने ५४१ कोरोना बाधित

0

सर्वाधिक ११७ रुग्ण जळगाव शहरात 

जळगाव – जिल्ह्यात मंगळवारी नव्याने ५४१ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २८ हजार १३२ एवढी झाली आहे. सर्वाधिक ११७ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. आज दिवसभरात ९ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात सद्यस्थितीत २० हजार २६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ७ हजार ०४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत .

जिल्ह्यात मंगळवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ११७ , जळगाव ग्रामीण २९, भुसावळ ३५, अमळनेर ९० , चोपडा ५७, पाचोरा ८ , भडगाव ११, धरणगाव ३३ , यावल १०, एरंडोल ३१, जामनेर ५७, रावेर ५, पारोळा २४, चाळीसगाव ६, मुक्ताईनगर १२, बोदवड ११, इतर जिल्ह्यातील ५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, भुसावळ , चोपडा तालुक्यात प्रत्येकी २ तसेच पाचोरा , पारोळा भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy