जिल्ह्यात नव्याने २७९ रूग्ण आढळले !

जळगाव पुन्हा शंभरी पार

0

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असुन गुरूवारी दिवसभरात नव्याने २७९ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १२२ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जळगाव शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण ५९८६४ रूग्ण आढळुन आले असुन त्यापैकी ५६५५४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ९, भुसावळ ४, अमळनेर २, चोपडा ३३, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव २, यावल ५, एरंडोल १, जामनेर १८, रावेर १, पारोळा २, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर २०, बोदवड १, इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण २७९ रूग्ण आढळुन आले आहे.

Copy