जिल्ह्यात दुसर्‍या दिवशी कोरोनाने २० रूग्णांचा मृत्यू

0

जिल्ह्यात नव्याने आढळले ८८९ रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात बुधवारी पुन्हा २० रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दिली आहे. दरम्यान आज जिल्हयात नव्याने ८८९ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ३५ हजार ३४२ एवढी झाली आहे. दुसरीकडे ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १३६ रुग्ण हे चाळीसगाव विभागात आढळून आले आहेत. तसेच जळगाव शहर ७५, जळगाव ग्रामीण ३१, भुसावळ ६५, अमळनेर ४७, चोपडा ४८, पाचोरा ५६, भडगाव ३६, धरणगाव ८३, यावल १९, एरंडोल ४१, जामनेर ८८, रावेर १४, पारोळा ६६, चाळीसगाव १३६, मुक्ताईनगर २३, बोदवड ४६, इतर जिल्ह्यातील १५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात २० कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, पाचोरा तालुका प्रत्येकी ४, भुसावळ तालुका ३, जळगाव व अमळनेर तालुका प्रत्येकी २ तर रावेर, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy