जिल्ह्यात तब्बल १२ कोरोना बाधित महिलांचा मृत्यू

पाच दिवसीय शिशुचाही समावेश ; आज नव्याने आढळले १११५ रूग्ण

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यासोबतच दैनंदीन कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्युचाही आकडा वाढतच आहे. दिवसभरात २१ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असुन त्यात तब्बल १२ महिला आणि एका पाच दिवसीय नवजात शिशुचा समावेश असल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. दरम्यान आज नव्याने १११५ रूग्ण बाधित झाले असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची परिस्थीती अत्यंत गंभीर होत आहे. आज दिवसभरात नव्याने १११५ रूग्ण आढळुन आले आहेत. आत्तापर्यंत एकुण रूग्णांची संख्या १ लाख ८२१८ इतकी झाली असुन ९५ हजार ०७९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज आढळुन आलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर २६०, जळगाव ग्रामीण १५, भुसावळ २१३, अमळनेर १७, चोपडा १२२, पाचोरा ३३, भडगाव १०, धरणगाव ४५, यावल ३८, एरंडोल ४८, जामनेर ६५, रावेर ७७, पारोळा ३१, चाळीसगाव ४६, मुक्ताईनगर ४२, बोदवड ३४ आणि इतर जिल्ह्यातील ८ रूग्ण असे एकुण १११५ रूग्ण आढळुन आले आहेत. तर ११०३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
बाधित २१ रूग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आज २१ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील ५, बोदवड ४, जळगाव शहर ३, जामनेर ३, अमळनेर, भुसावळ, एरंडोल, जळगाव, पाचोरा आणि यावल तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मयत रूग्णांमध्ये १२ महिला तर एका पाच दिवसीय नवजात शिशुचाही समावेश आहे.