जिल्ह्यात कोरोना रूग्णांची पुन्हा शंभरी पार

0

जळगाव- जिल्ह्यात आज नव्याने तब्बल १२४ रूग्ण आढळुन आले असुन सर्वाधिक ४५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. तर भुसावळ येथे १, अमळनेर १२, चोपडा १२, पाचोरा ४, धरणगाव १०, जामनेर ३, रावेर २, पारोळा ५, चाळीसगाव २८, बोदवड २ असे एकुण १२४ रूग्ण आढळुन आले आहेत. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या ५७ हजार ७१५ इतकी झाली असुन आत्तापर्यंत ५५ हजार ८५५ रूग्ण बरे झाले आहेत. तर १३६७ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय रूग्णालयातर्फे देण्यात आली आहे.

Copy