जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ९०० पार

4

जळगाव- जिल्ह्यात आज नव्याने ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले असुन रूग्ण संख्या ९०७ इतकी झाली आहे. तर जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी २०० पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
आज नव्याने ३६ रूग्ण आढळुन आले असुन त्यात जळगाव शहर ७, भुसावळ ७, अमळनेर ४, भडगाव १, यावल १, एरंडोल २, जामनेर ३, जळगाव ग्रामीण १, रावेर ५, पारोळा ५ अशा रूग्णांचा समावेश आहे.
*जळगाव, भुसावळने पार केला २००चा आकडा*
जिल्ह्यात आत्तापर्यंत जळगाव शहरात २०६ आणि भुसावळमध्ये २०५ अशी रूग्ण संख्या झाली असुन अमळनेरात १४३, चोपडा ४६, पाचोरा २८, भडगाव ७९, धरणगाव १८, यावल ३१, एरंडोल १७, जामनेर १७, जळगाव ग्रामीण २८, रावेर ५२, पारोळा १९, चाळीसगाव ८, मुक्ताईनगर ७ आणि दुसर्‍या जिल्ह्यातील ३ रूग्ण आहेत.

Copy