जिल्ह्यात कोरोना दहा हजाराच्या उंबरठ्यावर

0

 

जळगावात सर्वाधिक 88 कोरोनाबाधीत आढळले

जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने 281 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 9732 झाली आहे. सर्वाधिक 88 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 248 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात रविवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 88, जळगाव ग्रामीण 22, भुसावळ 21, अमळनेर 7, चोपडा 22, पाचोरा 14, भडगाव 9, धरणगाव 2, यावल 7, एरंडोल 27, जामनेर 16, रावेर 12, पारोळा 2, चाळीसगाव 11, मुक्ताईनगर 17, व इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. रविवारी दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील 2 , जळगाव तालुका, चोपडा, रावेर, चाळीसगाव, भडगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली

Copy