जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा 25 हजार पार

0

नव्याने 708 रुग्णांची भर ः सर्वाधिक 149 रुग्ण जळगाव शहरात आढळले

जळगाव – जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 708 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात कोरोनाने 25 हजारांचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णसंख्या 25 हजार 093 एवढी झाली आहे. सर्वाधिक 149 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. आज दिवसभरात 13 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 420 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. बुधवारी जिल्ह्यात विक्रमी 858 रुग्ण आढळून आले होते. यानंतर दुसर्‍या दिवशी कोरोनाने सातशेचा आकडा पार केला असून नव्याने 708 रुग्णांची भर पडली आहे. जळगाव शहर 149, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 42, अमळनेर 92, चोपडा 100, पाचोरा 30, भडगाव 13, धरणगाव 38, यावल 13, जामनेर 49, रावेर 38, पारोळा 78, चाळीसगाव 26, मुक्ताईनगर 18, बोदवड 5, इतर जिल्ह्यातील 5 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ, चाळीसगाव, तालुक्यात प्रत्येकी 3, रावेर तालुक्यात 2 तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भडगाव, पाचोरा, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy