जिल्ह्यात कोरोनाची 20 हजाराकडे वाटचाल: पुन्हा 498 कोरोनाबाधीत

0

जळगाव:जिल्ह्यात आज नव्याने 498 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 19 हजार 082 झाली आहे. सर्वाधिक 82 कोरोबाधाीत रुग्ण हे अमळनेर तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 402 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात मंगळवारी नव्याने 498 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 49, जळगाव ग्रामीण 16, भुसावळ 17, अमळनेर 82, चोपडा 44, पाचोरा 15, भडगाव 53, धरणगाव 26, यावल 9, एरंडोल 40, जामनेर 17, रावेर 17, पारोळा 32, चाळीसगाव 75, इतर जिल्ह्यातील 6 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर आणि पाचोरा शहरातील प्रत्येकी 2 तर जामनेर, रावेर व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy