जिल्ह्यात कोरोनाने बारा हजारांचा टप्पा ओलांडला

0

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 283 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून कोरोनाने बारा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या 12 हजार 036 झाली आहे. सर्वाधिक 95 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात सोमवारी नव्याने 283 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 95, जळगाव ग्रामीण 33, भुसावळ 3, अमळनेर 24, चोपडा 34, पाचोरा 2, भडगाव 3, धरणगाव 4, यावल 13, एरंडोल 22, जामनेर 24, रावेर 6, पारोळा 5, चाळीसगाव 1, मुक्ताईनगर 14 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव तालुका 3, जळगाव शहर 2, तर एरंडोल, पारोळा, भडगाव व यावल तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा मृत्यू आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy