जिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार

0

जळगाव शहरात सर्वाधिक 370 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जळगाव – जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा कोरोनाने एक हजारांचा आकडा पार केला असून जिल्ह्यात नव्याने 1098 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण
रुग्णसंख्या 36 हजार 440 झाली आहे. सर्वाधिक 370 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 19 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून
दुसरीकडे 718 रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले असून दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या हि जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब समजली जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाने 35 हजारांचा टप्पा पार केला आहे.
बुधवारी 20 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर दुसर्‍या दिवशी गुरुवारी पुन्हा 19 कोरोनबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून नव्याने 1098 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 370 , जळगाव ग्रामीण 51, भुसावळ 14, अमळनेर 106, चोपडा 97, पाचोरा 46, भडगाव 11, धरणगाव 51 , यावल 23, एरंडोल 39, जामनेर 12, रावेर 71, पारोळा 18, चाळीसगाव 72, मुक्ताईनगर 29, बोदवड 14, इतर जिल्ह्यातील 14 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 19 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, पाचोरा तालुक्यात प्रत्येकी 4 , धरणगाव तालुक्यात प्रत्येकी 3, भुसावळ चोपडा, तालुक्यात प्रत्येकी 2 तर भडगाव, जामनेर, एरंडोल, यावल, तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे

Copy