जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने ३९६ रूग्ण आढळले !

जळगावात सर्वाधिक १४५ रूग्ण बाधित

जळगाव: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढु लागली आहे. सोमवारी दिवसभरात नव्याने ३९६ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १४५ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जळगाव व चाळीसगाव शहरातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण ६१२७४ रूग्ण आढळुन आले असुन त्यापैकी ५७१०८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ३६, अमळनेर १२, चोपडा ६४, पाचोरा १, भडगाव ५, धरणगाव २, यावल १, एरंडोल १, जामनेर २, रावेर ५, पारोळा १५, चाळीसगाव ६९, मुक्ताईनगर १७, इतर जिल्ह्यातील ६ असे एकुण ३९६ रूग्ण आढळुन आले आहे.