जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; नवीन 601 कोरोनाबाधित रुग्णांची भर

0

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत सर्व रेकार्ड मोडले असून जिल्ह्यात रविवारी 601 या विक्रमी संख्येत कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 18 हजार 297 एवढी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 129 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 12 कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 343 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना कहर सुरुच असून प्रादुर्भाव वाढतच आहे. पाचशेच्या आकडेवारीत येणारी रुग्णसंख्येने रविवारी सहाशेचाआकडा पार केला. रविवारी नव्याने 601 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रू
ग्णांमध्ये जळगाव शहर 129, जळगाव ग्रामीण 68, भुसावळ 13, अमळनेर 82 , चोपडा 41, पाचोरा 23 , भडगाव 27 , धरणगाव 29, यावल 8, एरंडोल 42, जामनेर 4 , रावेर 9, पारोळा 32, चाळीसगाव 57, मुक्ताईनगर 21, बोदवड 12 व इतर जिल्ह्यातील 4 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यात 3, चाळीसगाव, अमळनेर तालुक्यात प्रत्येकी 2 व मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा धरणगाव आणि जळगाव शहरातील प्रत्येकी एका बाधित रुग्णांचा समावेश आहे . अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy