जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरुच; जिल्ह्याची चारशेकडे वाटचाल

0

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरुच आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली. नव्यान 368 नवीन रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक रूग्णांचा 164 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 222 बाधित झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण 34, भुसावळ 23, अमळनेर 5, चोपडा 28, पाचोरा 2, भडगाव 2, धरणगाव 2, जामनेर 4, पारोळा 7, रावेर 7, एरंडोल 6, चाळीसगाव 55, मुक्ताईनगर 23, बोदवड 3, इतर जिह्यातील 3 असे एकूण 368 रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात भुसावळ तालुक्यातील 1 आणि चोपड्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Copy