जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट: पुन्हा साडेचारशे पेक्षा अधिक रुग्ण

0

जळगाव:जिल्ह्यात आज नव्याने 456 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 14 हजार 343 झाली आहे. सर्वाधिक 96 कोरोबाधाीत रुग्ण हे अमळनेर तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे रविवारी दिवसभरात 285 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. रविवारी नव्याने 456 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 77, जळगाव ग्रामीण 14, भुसावळ 15, अमळनेर 96, चोपडा 56, पाचोरा 33, भडगाव 13, धरणगाव 27, यावल 4, एरंडोल 18, जामनेर 31, रावेर 18, पारोळा 24, चाळीसगाव 9, मुक्ताईनगर 13, बोदवड 6 इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरात 2 तर चोपडा, जामनेर, अमळनेर, मुक्ताईनगर, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी
दिली आहे.

Copy