जिल्ह्यात कोरोनाचा दहावा बळी; अमळनेरातील वृध्दाचा मृत्यू

0

जळगाव– कोरोना रुग्णालयात दाखल असलेल्या असलेल्या अमळनेर येथील 65 वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातला कोरोनाचा हा दहावा बळी असून अमळनेरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सहावर पोहचली आहे.

कोरोना रुग्णालयात 65 वर्षीय वृध्द हा 25 एप्रिल रोजी दाखल होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी या वृध्दाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच्यावर उपचार सुरु असतांना गुरुवारी दुपारी या वृध्दाचा मृत्यू झाला. कोरोनाच्या लक्षणांसोबत या वृध्दाला हृदयविकारही होता, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी बोलतांना दिली. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत भुसावळ येथील 2 जण, पाचोरा येथील एक, जळगावातील सालार नगरातील 1, तर अमळनेरातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात काहींचा उपचारादरम्यान तर काहींचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. तसेच काहींचा मृत्यूनंतर तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Copy