जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; त्रिशतकीय मालिका सुरूच

 

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दिवसभरात नव्याने ३१८ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १२३ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात भुसावळातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण ६०१८२ रूग्ण आढळुन आले असून त्यापैकी ५६ हजार ६८९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ९, भुसावळ २४, अमळनेर ११, चोपडा ३०, ,भडगाव ५ , धरणगाव १६, यावल १०, एरंडोल २, जामनेर १९, रावेर १४, पारोळा ११, चाळीसगाव २४, मुक्ताईनगर ११, बोदवड २, इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३१८ रूग्ण आढळुन आले आहे.

 

Copy