जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात नव्याने आढळले ३६३ रूग्ण

0

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असुन बुधवारी दिवसभरात नव्याने ३६३ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १६४ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात भुसावळातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण ५९५८५ रूग्ण आढळुन आले असुन त्यापैकी ५६ हजार ४१६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ६, भुसावळ ६, अमळनेर २४, चोपडा ३०, पाचोरा ३, भडगाव ३, धरणगाव ३, यावल २, एरंडोल ११, जामनेर ३, रावेर ८, पारोळा १७, चाळीसगाव ५३, मुक्ताईनगर १८, बोदवड ९, इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ३६३ रूग्ण आढळुन आले आहे.

Copy