जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: आज 911 रुग्ण

0

जळगाव शहरात सर्वाधिक 240 नविन रूग्ण

जळगाव: जिल्ह्यात शनिवारी नव्याने 911 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून कोरोनाने 30 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या 31 हजार 660 झाली आहे. सर्वाधिक 240 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे 518 रुग्ण कोरेानामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी विक्रमी एक हजार रुग्ण आढळून आल्यानंतर शनिवारी पुन्हा नव्याने 911 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 240 , जळगाव ग्रामीण 41, भुसावळ 54, अमळनेर 102, चोपडा 82, पाचोरा 44, भडगाव 10, धरणगाव 8 , यावल 13, एरंडोल 69, जामनेर 53, रावेर 54, पारोळा 43, चाळीसगाव 65, मुक्ताईनगर 4, बोदवड 10, इतर जिल्ह्यातील 9 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 3 तर एरंडोल तालुक्यात 2 तर जामनेर, यावल, भुसावळ या तालुक्यांत प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy