जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: पुन्हा 801 रुग्ण

0

सर्वाधिक १९३ रुग्ण जळगाव शहरात आढळलेगा

जळगाव – जिल्ह्यात बुधवारी नव्याने ८०१ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २८ हजार ९३३ एवढी झाली आहे. सर्वाधिक १९३ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. आज दिवसभरात ९ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर १९३ , जळगाव ग्रामीण ३८, भुसावळ ६९, अमळनेर ५१ , चोपडा ८२, पाचोरा ८, भडगाव ६, धरणगाव २१ , यावल २०, एरंडोल १२८, जामनेर ६२, रावेर २०, पारोळा १७, चाळीसगाव ५४, मुक्ताईनगर २, बोदवड २२, इतर जिल्ह्यातील ८ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एरंडोल, भुसावळ तालुक्यात प्रत्येकी २ तर अमळनेर, जामनेर, भडगाव, रावेर, चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy