जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; पुन्हा ६०५ कोरोनाबाधीत

0

जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने ६०५ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या १९ हजार ६८७ झाली आहे. सर्वाधिक ९३ कोरोबाधाीत रुग्ण हे चोपडा विभागात आढळून आले आहेत. दिवसभरात १० कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात बुधवारी नव्याने ६०५ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९०, जळगाव ग्रामीण ७२, भुसावळ १८, अमळनेर १२, चोपडा ९३, पाचोरा ९, भडगाव ६१, धरणगाव १७, यावल १०, एरंडोल ८२, जामनेर १७, रावेर ३०, पारोळा ७, चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर १, बोदवड १२ इतर जिल्ह्यातील ७ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात १० कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, जळगाव तालुका, पाचोरा, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, धरणगाव, भुसावळ, चोपडा, यावल तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy