जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: 13 हजाराचा टप्पा पार

0

जळगाव : जिल्ह्यात आज नव्याने 321 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 13 हजार 087 झाली आहे. सर्वाधिक 79 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे गुरुवारी दिवसभरात 200 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरुच आहे. तब्बल तिसर्‍या दिवशी कोरोनाने तीनशेचा आकडा पार केला आहे. गुरुवारी नव्याने 321 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 79, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 19, अमळनेर 15, चोपडा 20, पाचोरा 18, धरणगाव 18, यावल 9, एरंडोल 51, जामनेर 15, रावेर 6, पारोळा 3, चाळीसगाव 18, मुक्ताईनगर 36, बोदवड 1 इतर जिल्ह्यातील 1 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चाळीसगाव, धरणगाव तालुक्यात प्रत्येकी 2 तर जळगाव तालुका, रावेर, पाचोरा व एरंडोल या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy