जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: आज पुन्हा 226 रुग्ण

0

 

जळगाव : जिल्ह्यात आज नव्याने 226 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 6 हजार 393 झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक 94 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 28, भुसावळ 10, अमळनेर 21, चोपडा 24, पाचोरा 2, भडगाव 6, धरणगाव 3, यावल 2, एरंडोल 5, जामनेर 25, पारोळा 3, चाळीसगाव 1, बोदवड 1, अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 3, जळगाव ग्रामीण 2, यावल, चोपडा, चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे., माहिती जिल्हा शल्यचि कित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Copy