जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबेना; नवीन २६१ रुग्ण

0

 

जळगाव शहरात सर्वाधिक ८४ रूग्ण : दिवसभरात शहरातील ५ जणांचा     मृत्यू

जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने २६१ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६ हजार ६५४ झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ८४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात ९ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ८४, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ १४, अमळनेर ९, चोपडा ४०, पाचोरा ३, भडगाव ५, धरणगाव १६, यावल ११, एरंडोल २, जामनेर ११, रावेर १९, पारोळा २ , चाळीसगाव ९, मुक्ताईनगर २४, बोदवड १, अन्य जिल्ह्यातील सहा अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ९ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर ५, चोपडा तालुक्यातील २, पाचोरा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचि कित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Copy