जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबेना, आज नव्याने 605 रूग्ण

0

एरंडोल तालुक्यात सर्वाधिक 101 कोरोनाबाधीत आढळले

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 605 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 22 हजार 318 झाली आहे. सर्वाधिक 101 कोरोबाधाीत रुग्ण हे एरंडोल तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात 11 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 508 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात रविवारी नव्याने 605 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 97, जळगाव ग्रामीण 13, भुसावळ 8, अमळनेर 81, चोपडा 46, पाचोरा 36, भडगाव 47, धरणगाव 5, यावल 28, एरंडोल 101, जामनेर 33, रावेर 60, पारोळा 7, चाळीसगाव 29, मुक्ताईनगर 1, बोदवड 10, इतर जिल्ह्यातील 3 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 11 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यात 3, जळगाव शहर 2 तर जळगाव ग्रामीण, अमळनेर, चोपडा, धरणगाव, एरंडोल आणि रावेर तालुक्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy