जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबेना: आज पुन्हा 268 रुग्ण

0

 

जळगाव शहरात सर्वाधिक 78 बाधीत रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 268 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 9451 झाली आहे. सर्वाधिक 78 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 10 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 209 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात शनिवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 78, जळगाव ग्रामीण 22, भुसावळ 20, अमळनेर 8, चोपडा 42, पाचोरा 7, भडगाव 19, धरणगाव 7, यावल 8, जामनेर 8, रावेर 15, पारोळा 2, चाळीसगाव 23, मुक्ताईनगर 6, बोदवड 2 व इतर जिल्ह्यातील 1 अशी रूग्ण संख्या आहे. शनिवारी दिवसभरात 10 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जामनेर तालुक्यातील 3, जळगाव तालुक्यातील 2 तर एरंडोल, यावल, रावेर ,धरणगाव, मुक्ताईनगर येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाने मयतांचा आकडा 460 वर जावून पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Copy