जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबेना: पुन्हा 304 रुग्ण

0

 

जळगाव शहरात सर्वाधिक 107 रुग्ण

जळगाव:जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा तीनशेचा आकडा पार केला असून आज नव्याने 304 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 7796 झाली आहे. सर्वाधिक 107 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. दिवसभरात दहा कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात एकूण 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 107, जळगाव ग्रामीण 15, भुसावळ 19, अमळनेर 10, चोपडा 16, पाचोरा 21, भडगाव 5, धरणगाव 18, यावल 6, एरंडोल 4, जामनेर 21, रावेर 29, पारोळा 5, चाळीसगाव 15, मुक्ताईनगर 09, बोदवड 4 अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 10 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, चाळीसगाव, रावेर तालुक्यात प्रत्येकी 2 तर पाचोरा, अमळनेर, भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Copy