जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: नव्याने ७८० बाधित

0

सर्वाधिक २१५ रुग्ण जळगाव शहरात आढळले

जळगाव – जिल्ह्यात गुरुवारी नव्याने ७८० कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २५ हजार ८७३ एवढी झाली आहे. सर्वाधिक २१५ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. आज दिवसभरात ११ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ७८० रुग्ण आढळून आले होते. जळगाव शहर २१५, जळगाव ग्रामीण ४२, भुसावळ २२, अमळनेर ६२, चोपडा ८३, पाचोरा २६, भडगाव ३३, धरणगाव ३८, यावल २१, जामनेर ४२, रावेर २९, पारोळा ६९, चाळीसगाव ७९, मुक्ताईनगर १, बोदवड ९, इतर जिल्ह्यातील १ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ११ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव, भडगाव तालुक्यात प्रत्येकी २ तर जळगाव तालुका, चोपडा व अमळनेर तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy