जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: अकरा हजाराच्या उंबरठ्यावर

0

जळगाव शहरात सर्वाधिक 86 रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 267 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 10 हजार 858 झाली आहे. सर्वाधिक 86 कोरोबाधाीत रुग्ण हे
जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 271 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात गुरुवारी नव्याने 267 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 86, जळगाव ग्रामीण 23, भुसावळ 8, अमळनेर 4, चोपडा 16, पाचोरा 18, भडगाव 7, धरणगाव 9, यावल 12, एरंडोल 5, जामनेर 14, रावेर 2, पारोळा 15, चाळीसगाव 28 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 3, अमळनेर, यावल आणि जळगाव तालुक्यात प्रत्येकी 2 , पाचोरा, चोपडा, पारोळा, रावेर तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय महाविद्यालय व तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy