जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच: आज पुन्हा मोठी वाढ

जळगावात सर्वाधिक २४८ रूग्ण
जळगाव – जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढु लागली आहे. गुरूवारी दिवसभरात नव्याने ५४८ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक २४८ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जळगाव व बोदवड शहरातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण ६२६५० रूग्ण आढळुन आले असुन त्यापैकी ५७६४९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ६, भुसावळ ४६, अमळनेर २, चोपडा ८३, पाचोरा १, धरणगाव ८, एरंडोल ३, जामनेर ४५, रावेर २४, पारोळा १७, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर १८, इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ५४८ रूग्ण आढळुन आले आहे

Copy