जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच: नव्याने 696 बाधित

0

सर्वाधिक 169 रुग्ण जळगाव शहरात आढळले

जळगाव – जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 696 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 27 हजार 135 एवढी झाली आहे. सर्वाधिक 169 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. आज दिवसभरात 8 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 515 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून कोरोनाबाधीतांप्रमाणे कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही समाधानकारक आहे. रविवारी जिल्ह्यात 696 रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 169, जळगाव ग्रामीण 59, भुसावळ 26, अमळनेर 142, चोपडा 78, पाचोरा 12, भडगाव 12, धरणगाव 23, यावल 11, एरंडोल 5, जामनेर 34, रावेर 27, पारोळा 59, चाळीसगाव 27, मुक्ताईनगर 8, बोदवड 3, इतर जिल्ह्यातील 1 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 2, भुसावळ , पाचोरा, भडगाव, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल या तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy