जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच: नऊ हजाराचा टप्पा ओलांडला

0

 

आज नवीन 334 रुग्ण; जळगाव शहरात सर्वाधिक 90

जळगाव : जिल्ह्यात आज नव्याने 334 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. कोरोनाने नऊ हजारांचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णसंख्या 9183 झाली आहे. सर्वाधिक 90 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 10 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 204 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 90, जळगाव ग्रामीण 14, भुसावळ 18, अमळनेर 19, चोपडा 7, पाचोरा 40, भडगाव 14, धरणगाव 32, यावल 1, एरंडोल 9, जामनेर 32, रावेर 7, पारोळा 2, चाळीसगाव 40, मुक्ताईनगर 7, व इतर जिल्ह्यातील 1 अशी रूग्ण संख्या आहे. शुक्रवारी दिवसभरात 10 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील 3, यावल तालुक्यातील 2 तर जळगाव शहर, जळगाव तालुका, भुसावळ तालुका, रावेर तालुका आणि चाळीसगाव तालुका येथील प्रत्येकी एक याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Copy