जिल्ह्यात आठ जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

0

जळगाव : गुणवत्तापूर्वक कामगिरी करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना गुरुवारी पोलीस महासंचालकांनी बोध व सन्मानचिन्ह (पदक) जाहीर केले. त्यात जिल्ह्यात चार अधिकारी व चार कर्मचार्‍यांचा समावेश असून सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनी शुक्रवारी हे पदक प्रदान केले जाणार आहे.

अशी आहेत अधिकारी, कर्मचारी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ महादू ठाकूर, एमआयडीसीचे नवनियुक्त विनायक पांडूरंग लोकरे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे निरीक्षक राजेश रमेश भागवत, वरणगावचे तत्कालिन सहायक निरीक्षक जगदीश प्रल्हाद परदेशी (सध्या महामार्ग सुरक्षा पथक, रायगड), सहायक फौजदार भास्कर पाडूरंग कुळकर्णी, हवालदार विठ्ठल पंडीत देशमुख, अनिल राजाराम इंगळे व सुनील भाऊराव चौधरी यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.

विनायक लोकरे यांना लागली दुहेरी लॉटरी

महासंचालक सुबोध जायसवाल यांनी गुरुवारी 800 अधिकारी व कर्मचार्‍यांची यादी जाहीर केली.पदक जाहीर झालेल्यांमध्ये जगदीश परदेशी हे जिल्ह्याचे सुपूत्र असून लोहटार, ता. पाचोरा येथील रहिवाशी आहेत. चोपडा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विनायक लोकरे यांची गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली. हे पोलीस ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठे व तितकेच महत्वाचे मानले जाते. दुसरीकडे दुपारी त्यांना पोलीस महासंचालकांचे पदकही जाहीर झाले.

Copy